News18 Lokmat

18 लाखांचं बक्षीस असणाऱ्या 2 जहाल माओवाद्यांचं गडचिरोलीत आत्मसमर्पण

दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण केलं. त्यातला एक माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रमुख आहे, तर दुसरी त्याची पत्नी आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 07:55 PM IST

18 लाखांचं बक्षीस असणाऱ्या 2 जहाल माओवाद्यांचं गडचिरोलीत आत्मसमर्पण

गडचिरोली, 25 एप्रिल : दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण केलं. त्यातला एक माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रमुख आहे, तर दुसरी त्याची पत्नी आहे. या दोघांवरही 14 खुनाच्या गुन्ह्यांसह 40 च्या वर गुन्हे दाखल आहेत.

माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य दीपक उर्फ मंगरू सुकलू बोगामी हा त्यापैकी एक कट्टर माओवादी. त्याच्याविरोधात 32 गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी मोती उर्फ राधा झूरू मज्जी हिच्या विरोधात 2 खुनांसह 17 गुन्हे दाखल आहेत.

नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या या दांपत्याच्या शोधात गेले अनेक दिवस पोलीस होते. एकूण १८ लाख ५० हजार रुपये बक्षीस दोघांवर लावलेले होते. प्रत्येकी  9 लाख 25 हजारांचं बक्षीस या दोघांना पकडून देणाऱ्याला मिळेल, असं जाहीर करण्यात आलं होतं.

हे दोघेही गुरुवारी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांचं आत्मसमर्पण हे महाराष्ट्रातल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. हे दोन कट्टरवादी माओवादी शरण आल्यामुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी करणं सोपं जाईल, असं सांगण्यात येत आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...