माझ्या मुलीवर प्रेम करतो?, जाब विचारला म्हणून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने केली हत्या

माझ्या मुलीवर प्रेम करतो?, जाब विचारला म्हणून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने केली हत्या

मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून जाब विचारल्यामुळे भडकलेल्या तरूणाने मुलीच्या वडिलांवर आणि भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे.

  • Share this:

मनमाड, 14 एप्रिल : मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मनमाडमध्ये खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून जाब विचारल्यामुळे भडकलेल्या तरूणाने मुलीच्या वडिलांवर आणि भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे.

या हल्ल्यामध्ये मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. मनमाड तालुक्याच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड इथे हा खळबळजनक प्रकार समोर आला. घटनेची माहीती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मुलीच्या वडिलांना आणि भावाला रुग्णालयात दाखल केलं.

पण, रुग्णालयात नेईपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला तर मुलीचा भाऊ यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या नजिकच्या स्थानिक रुग्णालयता उपचार सुरू आहे. तर खून केल्यानंतर आरोपी फरार झाला. त्याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस मुलीची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


Loading...

VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love crime
First Published: Apr 14, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...