दारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

दारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

भेंडाळा शिवारात ग्रॅनोज प्रायव्हेट लिमिटेड ही दारू उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या मक्का साठवून ठेवलेल्या टाकीत बाल कामगाराचा गुदमरून अंत झाला.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 16 आॅक्टोबर : औरंगाबाद जवळील भेंडाळा शिवारात असलेल्या दारू उत्पादन करणाऱ्या ग्रॅनोज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाच हजार टन क्षमता असलेल्या मक्का सायलो टाकीमध्ये पडून बाल कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद नगर महामार्गावरील भेंडाळा शिवारात ग्रॅनोज प्रायव्हेट लिमिटेड ही दारू उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या मक्का साठवून ठेवलेल्या टाकीत बाल कामगाराचा गुदमरून अंत झाला.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हरिश्चंद्र तेलंगे वय १७ वर्ष असं या मृत मुलाचे नाव आहे. कंपनीत सकाळच्या शिप्टला आलेला राहुल हा दुपारी एकच्या दरम्यान कंपनीतील मका साठवण सायलो टाकीमध्ये बेल्टद्वारे मका भरत होता.

व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांने या मुलाला जवळ कुणीही नसताना एकट्याला पट्यामध्ये गुतलेली मका काढण्यासाठी टाकीत घुसवले यामध्ये बेल्ट मधील मक्का काढताना त्याचा पाय अडकुन तो पट्याद्वारे थेट टाकीच्या आतमध्ये गेला.

टाकीत गेल्यानंतर अंगावर मक्का पडल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कंपनी व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांनी दाबून ठेवली असा आरोप स्थानिक कामगारांनी केला. त्यानंतर कामगारांनी फोन करुन मृताच्या नातेवाईकांना माहिती कळविल्यानंतर मोठ्या संख्येने गावातील नागरिक घटनास्थळी आले आणि त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला कंपनी बंद करण्यास भाग पाडले.

कंपनीचे अधिकारी हे मृत्यू पावलेल्या कामगारासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांना चोप दिला. त्यानंतर मक्क्याची टाकी ग्रामस्थ आणि कामगारांच्या मदतीने वेल्डिंगद्वारे पाच वाजेदरम्यान कटरच्या साहाय्याने कट करुन मक्का बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

काही वेळानंतर जेसीबीच्या साहाय्याने मक्काबाहेर काढून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांनी दिली त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात मनुष्यवधाचा आणि बालकामगाराचा मृत्यूस कारणीभूत असल्याने गुन्हा दाखल करुन यांना त्वरित अटक करण्यात यावी जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह येथून हलवणार नसल्याचा पावित्रा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

===================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 09:41 PM IST

ताज्या बातम्या