चारा छावणीतल्या कडबा कटरमध्ये अडकून विद्यार्थ्याचे दोनही हात निकामी

विठ्ठल हा गुरांसाठी चारा तयार करत होता. कडबा कटरमध्ये घालत असताना चुकून त्याचा हात कटरमध्ये गेला. घाबरलेल्या विठ्ठलने तो हात काढण्यासाठी दुसरा हातमध्ये टाकला त्यामुळे त्याचे दोनही हात वेगळे झाले.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 07:09 PM IST

चारा छावणीतल्या कडबा कटरमध्ये अडकून विद्यार्थ्याचे दोनही हात निकामी

विरेंद्र उत्पात, सांगोला  28 जुलै : जनावरांसाठी ऊसाचा चारा कटींग करत असताना कडबा कटर मध्ये एका विद्यार्थ्याचे दोनही हात कापले गेले. सांगोला तालुक्यातल्या एका चारा छावणीत ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्यावर मिरज येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. विठ्ठल बलभिम गलांडे असं त्या मुलाचं नाव आहे. घरची गरीब परिस्थिती असताना काम करून भाकरीसाठी दोन पैसे मिळविण्यासाठी हा विद्यार्थी धडपड करत होता. त्यात हा अपघात झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झालाय.

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, नाहीतर 288 जागा जाहीर करणार

एखतपूर, ता.सांगोला येथील मायाक्का माऊली दूध उत्पादक संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या छावणीवर ही घटना घडलीय. सांगोला तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने जनावरांच्या छावण्या अजुनही सुरु आहेत. या छावण्यांवर जनावरांची देखभाल करण्यासाठी पशुपालकांसह त्यांची मुलेही राहत आहेत.

विठ्ठल हा गुरांसाठी चारा तयार करत होता. कडबा कटरमध्ये घालत असताना चुकून त्याचा हात कटरमध्ये गेला. घाबरलेल्या विठ्ठलने तो हात काढण्यासाठी दुसरा हातमध्ये टाकला त्यामुळे त्याचे दोनही हात वेगळे झाले. दोन्ही हात कडबा कटर मध्ये अडकून कोपरा पासून तुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. यावेळी छावणीतील पशुपालकाने विठ्ठलला गंभीर अवस्थेत तात्काळ उपचाराकरिता सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

Loading...

याठिकाणी डॉक्टरांनी  त्याच्या तुटलेल्या दोन्ही हातावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता मिरज येथे हलविण्यात आलं. विठ्ठल गलांडे हा इयत्ता 7 वीत शिक्षण घेत असून त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. या घटनेला काही दिवस उलटले तरी अजुन कुठल्याही अधिकाऱ्याने या पीडित कुटुंबाची विचारपूस केली नाही. विठ्ठलच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी अशी मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...