S M L

शिर्डी : बोअरवेलमध्ये पडलेल्या साईला बाहेर काढले, पण मृत्यूने गाठले

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या सात वर्षीय मुलाला काढण्यात यश आले असले तरी त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाहीये.

Sachin Salve | Updated On: May 15, 2017 08:12 PM IST

शिर्डी : बोअरवेलमध्ये पडलेल्या साईला बाहेर काढले, पण मृत्यूने गाठले

शिर्डी, 15 मे : कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या सात वर्षीय मुलाला काढण्यात यश आले असले तरी त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाहीये.

आज सकाळी 11 वाजता साई बारहाते हा सात वर्षीय मुलगा आपल्या आजोबासोबत शेतावर शेळ्या चारण्यासाठी गेला असता बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेलच्या खड्ड्याशेजारी दुसरा खड्डा घेण्यास सुरुवात केली आणि पोलीस, महसूल, आरोग्य विभाग आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारीही दिवसभर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.सात तास अथक प्रयत्न करून प्रशासन आणी गावकऱ्यांनी साईला बाहेर काढले आणी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले मात्र त्याची परीस्थिती बघून त्यास शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये नेले मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. साईच्या दुर्दैर्वी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 08:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close