सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी नव्हे, एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा

'दुश्मन पर फतेह', JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”', असा मेसेज देऊन दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 02:00 PM IST

सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी नव्हे, एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा

ठाणे, 17 जून- मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  'दुश्मन पर फतेह', JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”', असा मेसेज देऊन दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळवळ उडाली होती. मात्र, ही धमकी नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने हे खोडसाळपणा केला आहे.

ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये सोमवारी सकाळी धमकीचा मेसेज आढळला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते. हा विक्रोळीचा आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून हा खोडसाळपणा केला आहे. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तरुणाने

धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाइल नंबर लिहिला होता.

स्वामी नारायण मंदिर बॉम्बने उडवून देण्याची मिळाली होती धमकी

धुळ्यातील नवीन देवपूर येथील दत्त मंदिर परिसरातील स्वामी नारायण मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. मंदिराच्या टपाल पेटीत हिंदी भाषेतील दोन निनावी पत्रे आढळली होती. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Loading...

मंदिराच्या टपाल पेटीत धमकी देणारे हिंदी भाषेतील दोन निनावी पत्रे सापडल्याची माहिती मंदिर प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दिली होती. त्यांनी याबाबत दखल घेत मंदिर परिसराला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करून आढावा घेतला होता. मंदिर परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची तपासणी करुनच मंदिरात प्रवेश देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.


VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 01:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...