गडकरींच्या शेतात बॉयलरचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शेतातील सौंदर्य प्रसाधने तयार करण्याच्या प्रकल्पात असलेले बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 12:11 PM IST

गडकरींच्या शेतात बॉयलरचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू

नागपूर, 23 मे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शेतातील सौंदर्य प्रसाधने तयार करण्याच्या प्रकल्पात असलेले बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून यात प्रदीप महादेव श्रीराव या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील नितीन गडकरी यांचं मुळ गाव असलेल्या धापेवाडा येथे शेती आहे याच ठिकाणी हळद उकडण्यासाठी एक बॉयलर लावण्यात आलं होतं, या बॉयलरचा स्फोट झाल्यानं हा अपघात घडला आहे. सुदैवाने यात मोठी जीवित हानी झाली नाही.

नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचनताई यांच्या मालकीची कांचन इंडिया ही सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे, यासाठी लागणारं उत्पादन त्यांच्या शेती परिसरात घेतलं जातंय, त्याच परिसरात हळदी उकळण्यासाठी एक बॉयलर आहे, तिथे अनेक कामगार काम करतात. मंगळवारी संध्याकाळी अचानक बॉयलरचा स्फोट झाला, यामुळे बॉयलरमध्ये हळद उकडण्यासाठी असलेलं गरम पाणी कामगाराच्या अंगावर आलं आणि त्यात भाजलेल्या प्रदीप श्रीराव या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...