उद्धवने राजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा भाजपचा आरोप

भांडूप पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपने महापौरपदावर दावा ठोकताच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेनं आज बीएमसीत थेट मनसेचेच 6 नगरसेवक फोडून महापौरपदाचा खुट्टा बळकट केलाय. शिवसेनेच्या या वेगळ्या गटनोंदणीच्या अनपेक्षित खेळीने भाजपचा चांगलाच तिडपापड झाला असून किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या या राजकीय खेळीविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मनसेलाही शिवसेनेच्या या फोडाफोडीचा जबरजस्त धक्का बसलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 09:17 PM IST

उद्धवने राजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा भाजपचा आरोप

मुंबई, 13 ऑक्टोबर : भांडूप पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपने महापौरपदावर दावा ठोकताच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेनं आज बीएमसीत थेट मनसेचेच 6 नगरसेवक फोडून महापौरपदाचा खुट्टा बळकट केलाय. शिवसेनेच्या या वेगळ्या गटनोंदणीच्या अनपेक्षित खेळीने भाजपचा चांगलाच तिळपापड झाला असून किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या या राजकीय खेळीविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मनसेलाही शिवसेनेच्या या फोडाफोडीचा जबरजस्त धक्का बसलाय. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या 6 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करू नये, अशी मागणी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडे केलीय.

मनसेच्या फुटलेल्या 6 नगरसेवकांची नावं-

अर्चना भालेराव, वॉर्ड 126

परमेश्वर कदम, वॉर्ड - 133

दिलीप लांडे, वॉर्ड - 163

Loading...

अश्विनी माटेकर, वॉर्ड 156

हर्षला मोरे, वॉर्ड - 189

दत्ता नरवणकर, वॉर्ड - 197

संजय तुर्डे हे मनसेचे 7 वे नगरसेवक मात्र, शिवसेनेत जाणार नसल्याचं कळतंय.

मुंबई महापालिकेतील या राजकीय फोडाफोडीची बातमी थडकताच बीएमसीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणून मग प्रशासनाकडून मॉक ड्रिलच्या नावाखाली चक्क महापालिकेचे सर्व दरवाजेच बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या राजकीय फोडाफोडीमुळे बीएमसीत शिवसेनेचं संख्याबळ बऱ्यापैकी वाढलंय.

सोमय्यांचा शिवसेनेवर घोडेबाजाराचा आरोप

‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. मनसेच्या 6 नगरसेवकांना प्रत्येकी 3 कोटी रुपये देऊन फोडलं गेल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली आहे. तर जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु.’ अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली.

बीएमसीतलं हे सगळं राजकारण कालच्या भांडूप पोटनिवडणूक निकालानंतर सुरू झालंय. या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवल्याने शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात फक्त एकाचा फरक उरला होता. त्याचाच उल्लेख करत काल खा. किरीट सोमय्यांनी लवकरच आमचा महापौर करू, अशी भीमगर्जना केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच शिवसेनेकडून ही तिरकी चाल खेळली गेल्याचं बोललं जातंय. मनसेचे नगरसेवक फोडण्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आ. अनिल परब यांनी पडद्यामागून सूत्र हलवल्याचं सांगितलं जातंय.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

शिवसेना अपक्षांसह - 84 4 अपक्ष = 88(6मनसे )=94 ( ?)

भाजप 83 अभासे 1 एक अपक्ष = 85

काँग्रेस - 30

राष्ट्रवादी काँग्रेस - 9

मनसे - 7

सपा - 6

एमआयएम - 2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...