मुख्यमंत्र्यांनी पाण्याचं बिल थकवलं, BMC ने निवासस्थानाला डिफॉल्टर घोषित केलं

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपये एवढं पाणी बिल थकलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 10:54 AM IST

मुख्यमंत्र्यांनी पाण्याचं बिल थकवलं, BMC ने निवासस्थानाला डिफॉल्टर घोषित केलं

मुंबई, 24 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानाला मुंबई महानगरपालिकेनं डिफॉल्टर घोषित केलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपये एवढं पाणी बिल थकलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याच बंगल्याबाबतीत ही परिस्थिती समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी बिल थकवणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांवर महानगरपालिका तातडीने कारवाई करते. मात्र मंत्र्यांच्या बाबतीत मात्र असं होताना दिसत नाही. कारण राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवासस्थानाचं एकूण 8 कोटींचं पाणी बिल थकलं आहे. मात्र तरीही महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कोणत्या मंत्र्यांच्या निवासस्थानी पाणी बिल थकलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला)

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी)शिक्षामंत्री विनोद तावडे (सेवासदन)

Loading...

ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन)

आदिवासीमंत्री विष्णू सावरा (सागर)

जलसंपदामंत्री गिरीश महाजन (शिवनेरी)

परिवहनमंत्री दिवाकर रावते (मेघदूत)

उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन)

पर्यावरणमंत्री रामदास कदम (शिवगिरी)

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन)

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन)

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट)

पशुपालन मंत्री महादेव जानकर (मुक्तागिरी)एकनाथ खडसे (रामटेक)

विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर  (अजंठा)

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 16 हजार विद्यार्थ्यांना पाणी नाकारलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BMC
First Published: Jun 24, 2019 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...