मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांची मुंबई महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजॉय मेहता हे 1984 बॅचचे IAS अधिकारी आहेत. मेहता याच वर्षी सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 मे- मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांची मुंबई महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजॉय मेहता हे 1984 बॅचचे IAS अधिकारी आहेत. मेहता याच वर्षी सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आचार संहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने मुख्य सचिवपदी अजॉय मेहता यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) एक वर्षासाठी नियुक्ती झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश काढला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू..

राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव अजॉय मेहता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होण्याआधी ते राज्यात पर्यावरण खात्याचे मुख्य सचिव होते.

संजय निरुपम यांनी केला होता गैरव्यवहाराचा आरोप..

दरम्यान, अजॉय मेहता आणि वाद यांच्या जुने नाते आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी अजॉय मेहतांवर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. मेहता यांनी 4,372 ,कोटी रुपयांचा विद्युत घोटाळ्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. याशिवाय, 2 लाख वीज मीटर खरेदीतही घोटाळा केल्याचा ठपका मेहतांवर ठेवण्यात आला होता. एमएसआयडीसीचे संचालकपदी असताना मेहतांनी सरकारची परवानगी न घेता 10 विदेश दौरे केले होते.धक्कादायक! कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमधील टिकटॉक VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या