S M L

रत्नागिरीतल्या समुद्रकिनाऱ्यांवर ब्लू बटण जेलीफिशची रांगोळी

पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशितोष्ण पाण्याच्या पट्ट्यात या जेलिफिशच अस्तित्व आढळतं.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 18, 2017 04:12 PM IST

रत्नागिरीतल्या समुद्रकिनाऱ्यांवर ब्लू बटण जेलीफिशची रांगोळी

दिनेश केळुस्कर

18 एप्रिल :  रत्नागिरीतील वेगवेगळ्या समुद्रकिनारी लाखोंच्या संख्येने जेली फिश येऊन विसावले आहेत. बटनासारख्या आकाराचे आणि निळ्या रंगांचे असल्याने या जेली फिशना ‘ब्ल्यू बटन जेली फिश’ असंही म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव 'पॉप्रिटा पॉप्रिटा' असं आहे.

हे जेलिफिश सारखे दिसत असले तरी ते इतर जेलिफिश सारखे विषारी नाहीत. मात्र यांच्या तंतूंचा मानवी त्वचेला स्पर्श झाला तर त्वचा लाल होते. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशितोष्ण पाण्याच्या पट्ट्यात या जेलिफिशच अस्तित्व आढळतं.वतावरणातील बदलामुळे हे ब्ल्यू बटण जेली फिशना प्रवास करतात. जोरदार समुद्री वारे आणि प्रवाहांबरोबर हे मासे सध्या कोकणच्या किनाऱ्यावर आलेत. सुमारे दीड इंच रुंदी असलेला हा समुद्री जीव फ्लोट आणि हायड्रॉइड्स या दोन भागांनी बनलेले असतात. या जेलिफिशच्या मध्यभागी दिसणाऱ्या बटणासारख्या भागाला फ्लोट म्हणतात. या फ्लोट मध्ये एक विशिष्ठ प्रकारचा गॅस तयार झालेला असतो. या गॅसमुळे हे जीव समुद्राच्या लाटांवर तरंगतात. फ्लोटच्या आजूबाक्जूला असलेल्या निळ्या रंगाच्या तंतूंना हायड्रॉईड्स म्हणतात. यात एक प्रकारचा चिकट द्रव असतो जो मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचा लाल होते. समुद्रातल्या माशांची अंडी आणि इतर शेवाळासारखा भाग हे या जेलिफिशचं खाद्य असून ते फार काळ किनाऱ्यावर राहिले तर मरून जातात .

भाट्ये आणि आरेवारे किनाऱ्यावर जेली फिश पाहाण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, त्याला आपण स्पर्श केल्यास स्पर्श केलेला आपल्या शरीराचा भाग लालसर होऊन तिथे जळजळ होते.

 

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 03:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close