बारामतीत येत्या रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन

बारामतीत येत्या रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन

मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त एसीपी इसाक बागवान यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद हे 'न्यूज18 लोकमत'चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे भूषवणार आहेत

  • Share this:

बारामती,23 नोव्हेंबर : बारामती सायकल क्लब आणि एक जीव सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.

26/11च्या दहशतवादी अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आदरांजली म्हणून हे रक्तदन शिबीर घेण्यात येतंय.

'हायटेक टेक्सटाईल पार्क'च्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त एसीपी इसाक बागवान यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद हे 'न्यूज18 लोकमत'चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे भूषवणार आहेत. याचबरोबर या शिबीरात डॉ. संदीप पखाले, अप्पर पोलीस अधीक्षक पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष यांच्यासह अनेकांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

26 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता बारामतीतल्या भिगवण रोडजवळील रिमांड होममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. बारामतीकरांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असं आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आलंय. शिबिराचं हे सलग तिसरं वर्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 01:51 PM IST

ताज्या बातम्या