News18 Lokmat

पाच लाख द्या, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, तरुणीकडून भाजप नगरसेवकाला धमकी

पाच लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही तिने दया गायकवाड यांना दिली होती. दया गायकवाड यांनी प्रिया खरात या तरुणीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 07:25 PM IST

पाच लाख द्या, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, तरुणीकडून भाजप नगरसेवकाला धमकी

मुंबई, 4 मे- बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन भाजप नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या तरुणीच्या कल्याण पोलिसांना मुसक्या आवळल्या. प्रिया खरात असे आरोपी तरुणीचे नाव आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील भाजप नगरसेवक दया गायकवाड यांना गेल्या काही महिन्यांपासून प्रिया खरात ही तरुणी खंडणीसाठी ब्लॅकमेल करत होती. पाच लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही तिने दया गायकवाड यांना दिली होती. दया गायकवाड यांनी प्रिया खरात या तरुणीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. प्रिया खरात ऑफिसमध्ये आली. प्रिया खरात हिने पैसे घेतले. पैसे घेऊन जाणार त्याचवेळी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. सीसीटीव्ही कॅमेराकडे हा प्रकार कैद झाला आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल केला, परंतु...

दरम्यान, यापूर्वीही आरोपी प्रिया खरात हिने नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, परंतु नंतर तिने तो मागे घेतला होता.

Loading...


SPECIAL REPORT : 'वंचित' फॅक्टरमुळे औरंगाबादेत कोणाकोणाची उडवली झोप?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...