S M L
Football World Cup 2018

का मिळतेय कोकणात काळ्या मिरीच्या शेतीला अधिक पसंती?

काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 04:32 PM IST

का मिळतेय कोकणात काळ्या मिरीच्या शेतीला अधिक पसंती?

14 मार्च : कोकणात मसाला पिकांची शेती सुरु केली तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. आणि यासाठीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाची टीम मनापासून झटतेय. सध्या काळ्या मिरीच्या मसाला पिकाची शेती बरीच चर्चेत आहे. कारण मसाला शेती असली तरी त्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा आणला हेच खरं आहे.

काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठानं या पिकाच्या लागवड आणि संशोधनावर बरंच काम केलंय. काळ्या मिरीचं पिक झाडावर उंच जातं. त्याची काढणी करणं अवघड जातं. यासाठी कृषी विद्यापिठातल्या तज्ज्ञांनी खास बुश पेपर वनस्पती विकसीत केली असून त्यावर काळ्या मिरीचं उत्पादन घेणं सोपं जातंय.

बुश पेपर वनस्पतीची लागवड करणं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. काळ्या मिरीची लागवड करणं तसं सोपं काम आहे. या झाडाच्या सावलीत काळी मिरी अतिशय सहज वाढतेय. विशेष म्हणजे वेलींना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही.

काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळं काळ्या मिरीची उंची नियंत्रीत होऊन तिचं मुबलक उत्पादन घेणं आणि उत्पन्न वाढवणं सोपं जाणार आहे.

बुशपेपर वनस्पतीची लागवड करणं आणि तिचं संगोपन करणं कोकणात सोपं आहे. या आधार देणाऱ्या वनस्पतीच्या लागवडीसाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा प्रकल्प उत्तम पद्धतीने राबवू शकतो.

काळ्या मिरीची शेती कोकणात वाढली तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखलं जावं यासाठी बुश पेपरचा सपोर्ट नक्कीच कामी येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close