औरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेची नग्न पूजा करून देणार होते बळी, पण...

औरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेची नग्न पूजा करून देणार होते बळी, पण...

गुप्तधनासाठी आज सायंकाळी 4 वाजता विशेष पूजा होणार होती. या पूजेसाठी अंधार पडल्यानंतर कुमारिका बालिकेचा नग्न पूजा होणार होती.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 24 आॅगस्ट : औरंगाबादमध्ये गुप्तधनासाठी एका चिमुरडीचा बळी देण्याची घटना घडणार होती मात्र वेळीच अंनिस आणि पोलिसांनी धाव घेऊन हा डाव उधळून लावला. ही घटना आहे औरंगाबाद जवळील फुलंब्रीच्या रांजणगाव इथं घडली. गुप्त धन काढून देण्यासाठी आज रांजणगाव परिसरात एका कुमारिकेची नग्न पूजा करण्यात येणार होती मात्र अंनिसच्या कार्यकर्ता यांनी आणि फुलंब्री पोलिसांनी वेळीच छापा मारून 2 मांत्रिकांसोबत पूजेचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका बालिकेचा जीव वाचला.

मांत्रिक बाळू शिंदे असं या भामट्याचे नाव आहे आणि त्याच्यासोबत इमाम पठाण हा त्याचा सहकारी आहे. या घरातून गुप्तधन काढण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील या दोन भामट्या मांत्रिकांनी दिगंबर जाधव याला जुन्या घरातील गुप्त धन काढण्यासाठी दोन लाख रुपये उकळले. आज सकाळी दिगंबर जाधव यांच्या घरात भामट्या मांत्रिकाने विश्वास बसवा यासाठी चलाखीने गाडलेली देवीची मूर्ती उकरून काढली ज्यामुळे जाधव कुटुंबाचा विश्वास या भामट्या बाळू शिंदे यांच्यावर बसला.

आज दिगंबर जाधव यांच्या घरात जुन्या घरात धनाचा हंडा काढण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन आज केले. मात्र अंनिसचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांना या प्रकरणाची कुणकुण लागली आली. भोसले यांनी फुलंब्री पोलीसच्या मदतीने हा प्रकार उधळून लावला.

गुप्तधनासाठी आज सायंकाळी 4 वाजता विशेष पूजा होणार होती. या पूजेसाठी अंधार पडल्यानंतर कुमारिका बालिकेचा नग्न पूजा होणार होती. आजपर्यंतच्या असल्या प्रकारांमध्ये पूजेनंतर नरबळी दिल्याच्या घटना आहेत. या प्रकरणात  मुलीचा पूजेनंतर बळी देण्याच्या योजना आखल्या होत्या असा दावा अंनिसचे शहाजी भोसले यांनी केला.

बाळू शिंदे हा गुप्त धनासाठी विशेष पूजा करणार होता.. दुसरा भामटा मांत्रिक इमाम पठाण हा कुमारिका बालिकेचा बंदोबस्त करणार होता. बाळू शिंदे याने आधीही अश्या पद्धतीने गुप्त धनासाठी बोगस पूजा करून अनेकांना गंडवल्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. इमाम पठाण हा पूजेसाठी मुलगी कुठून आणणार होता हे शोधून काढणे पोलीस समोर आव्हान आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

PHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 06:37 PM IST

ताज्या बातम्या