कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेनं दाखवले काळे झेंडे

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेनं दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

  • Share this:

24 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी कृती समितीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसानी त्यांना ताब्यात घेतलंय.

पिरवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी रवाना होणार होते. त्या रोडवर आंदोलक शेतकरी थांबले होते याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान,मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी भेट दिली नंतर कोल्हापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यानंतर वारणानगरमध्ये नागरिकांशी  मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 08:09 PM IST

ताज्या बातम्या