समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची आज काळी दिवाळी

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची आज काळी दिवाळी

शिवडे ग्रामस्थांनी काळा आकाश कंदील लावून गावात काळी दिवाळी साजरी केली.

  • Share this:

नाशिक,19 ऑक्टोबर: समृद्धी महामार्गला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज काळी दिवाळी साजरी केली. शिवडे ग्रामस्थांनी काळा आकाश कंदील लावून गावात काळी दिवाळी साजरी केली.

समृद्धी महामार्गाला नाशिक जिल्ह्यात अजूनही 6 गावातील शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा एक हायस्पीड हायवेचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचं ड्रिम प्रोजेक्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन करणं गरजेचं आहे.पण आपली जमीन न देण्याच्या भूसंपादन करणं गरजेचं आहे. पण आपली बागायत जमीन देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.याच समृद्धी प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी शेतकरी काळी दिवाळी साजरी करत आहे.

तेव्हा आतातरी या समृद्धी प्रकल्पाचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 04:35 PM IST

ताज्या बातम्या