युतीचा पालघरमध्ये सातारा पॅटर्न, शिवसेनेच्या जागेवर लढवणार भाजपचा 'हा' नेता

लोकसभा निवडणुकीत भाजपामध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवार नेत्यांचं इनकमिंग सुरू असताना भाजपाने सेनेला यंदा जास्त जागा सोडल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 02:52 PM IST

युतीचा पालघरमध्ये सातारा पॅटर्न, शिवसेनेच्या जागेवर लढवणार भाजपचा 'हा' नेता

अजित मांढरे, प्रतिनिधी

पालघर, 25 मार्च : पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर भाजपाचे राजेंद्र गावीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पालघर लोकसभा जागेवर येत्या २४ तासात निर्णय घेणार अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपामध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवार नेत्यांचं इनकमिंग सुरू असताना भाजपाने सेनेला यंदा जास्त जागा सोडल्या आहेत. साताऱ्यातील लोकसभा जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट देण्यात आलं अशीच परिस्थिती पालघर लोकसभा मतदार संघात होणार असं दिसतं.

भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना शिवसेना नरेंद्र पाटीलांप्रमाणे दत्तक घेणार असून जागा जरी शिवसेनेच्या वाटेला आली असली तरी उमेदवार मात्र भाजपाचा असणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या नेत्याने दिली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन चिंतामण वनगा यांच्या नावाचे भावनिक कार्ड चालणार नाही. योग्य उमेदवार न दिल्यास हातची जागा जाईल. या भितीने युतीने पालघरमध्येदेखील सातारा पॅटर्न वापरला आहे.

त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एकमेकांच्या विरोधात काम केलेले भाजपा सेनेचे कार्यकर्ते काम करतील का? त्यातच शिवसेनेची लोकं भाजपाच्या उमेदवाराचं काम करतील का? या प्रश्नांनी युतीच्या नेत्यांना बुचकळ्यात टाकलं आहे.

Loading...

राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...