भाजप कार्यकारणी बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत

निवडणुकीत कधी लागतील याचा नेम नाही, स्वबळावर सत्तेसाठी प्रयत्न करा असे आदेशच कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 04:27 PM IST

भाजप कार्यकारणी बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत

26 एप्रिल : पुन्हा एकदा भाजपमध्ये स्वबळाचे वारे वाहू लागले आहे. पिंपरी-चिंचवडच्या भाजप कार्यकारणी बैठकीत मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले गेले आहे. निवडणुकीत कधी लागतील याचा नेम नाही, स्वबळावर सत्तेसाठी प्रयत्न करा असे आदेशच कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

दहा महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप कार्यकारणीची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली.

याबैठकीत सत्तेत असूनही विरोध करणाऱ्या शिवसेनेवर आसुड ओढण्यात आलाय. शिवसेनेच्या वागणुकीवर भाजपच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे कुणाची मदत न घेता स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे यावर एकमत झालंय.

मध्यावधी निवडणुका कधी लागतील याचा नेम नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहा असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले. तसंच  प्रत्येक मतदारसंघात 6 महिने आमदार, 15 दिवस मंत्री आणि पदाधिकारी यांचा दौरा आखण्यात आलाय. राज्य सरकारची काम जनतेपर्यंत पोहचवा असं आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...