शेतकरी कुटु्ंबाला मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची कोठडीत रवानगी

शेतकरी कुटु्ंबाला मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची कोठडीत रवानगी

पुरवणी जबाबात त्याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याची कलमवाढ ही करण्यात आली आहे

  • Share this:

विजय कमळे, प्रतिनिधी

अहमदनगर, 29 जानेवारी : शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण करून जिवंत जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपाखाली भाजप किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर याला अटक करण्यात आली होती. आज त्याला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सोमवारी जालन्यात एकीकडे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असताना रावसाहेव भवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खांडेभराडा कुटुंबीय आणि इतर दोन महिलांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होता. याप्रकरणी पोलिसानी भवर याला रात्री उशीरा अटक केली.

पुरवणी जबाबात त्याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याची कलमवाढ ही करण्यात आली आहे. दरम्यान, आज जालना न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी जेसीबी मशीन आणला होता. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे या कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी या कुटुंबाला जबर मारहाण केली होती. भवर यांनी खांडेभारड यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली होती. या घटनेनंतर खांडेभारड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली.

==================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या