भाजपच्या महिला नगरसेवक आणि माजी महापौरांमध्ये हाणामारी

भाजपच्या महिला नगरसेवक आणि माजी महापौरांमध्ये हाणामारी

भाजपच्या नगरसेविका आणि पक्षाच्याच माजी महापौरांमध्ये हाणामारी झाल्याने पक्षातले मतभेद उघड झाले आहेत.

  • Share this:

विजय देसाई, मुंबई 8 जुलै : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या भाजपच्या नगरसेविका आणि भाजपच्याच माजी महापौरांमध्ये कार्यक्रमाच्या जागेवरून तुंबळ हाणामारी झाली. भाजपाच्या माजी महापौर गीता जैन या एका कार्यक्रमाला आल्या होत्या. जेष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गीता जैन यांना बोलविण्यात आलं होतं. हा कार्यक्रम सुरू असताना रुपाली मोदी या भाजपच्या नगरसेविका तिथे आल्या, त्यांच्यात भांडण झालं आणि नंतर हाणामारी झाली. शिस्तबद्द भाजपच्या दोन महिला नेत्यांमध्ये झालेलं हे भांडण नंतर चर्चेचा विषय झालंय.

ज्या जागेवर हा कार्यक्रम झाला ती जागा आपल्या नगरसेवक फंडातून तयार झाल्याचा दावा रुपाली मोदी यांनी केलाय. त्यामुळे त्या आणि त्यांचे समर्थक हे कार्यक्रम स्थळी आले आणि त्यांनी कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. मात्र जैन आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रम बंद होणार नाही असं सांगितलं.

उद्याचा दिवस वैऱ्याचा; 24 तास धोका कायम : मुंबई पोलिसांनी दिला 'हा' इशारा

तेव्हा दोघींमध्ये वाद झाला आणि जैन या मोदी यांच्या अंगावर धावून गेल्या. तेव्हा मोदींनीही त्याचा प्रतिकार केला. हे सुरू असतानाच दोघींचे समर्थकही आपसात भिडले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कार्यक्रमाचा आखाडा झाला.

भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्यामध्ये वाद आहे. तर रुपाली मोदी या मेहता समर्थक आहेत. त्या वादातूनच हा प्रकार घडल्याचं म्हटलं जातंय.

मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

कर्नाटकमधलं राजकीय नाट्य आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. राजधानी बंगळुरूमध्ये जरी वातावरण गरम असलं तरी त्याचे पडसाद मुंबई पडत आहेत. मुंबईतल्या ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार वास्तव्याला आहेत त्या सोफिटेल हॉटेलसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजही जोरदार निदर्शने केलीत. आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेस-जेडीएसचे 14 आमदार या हॉटेलमध्ये मुक्कामी आले आहेत.

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर हे सर्व आमदार एका खास विमानाने मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावरून ते सरळ बीकेसीतल्या पंचतारांकित सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले. ही बातमी कळताच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी हॉटेलकडे धाव घेतली. काँग्रेसचे नेते नसिम खान, भाई जगताप, एकनाथ गायकवाड या नेत्यांनी सोफिटेलमध्ये जाण्याचा रविवारी प्रयत्न केला मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

भाजप सरकारच्या इशाऱ्यावरूनच पोलीस प्रवेश नाकारत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही सोफिटेल हॉटेलसमोर जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 10:00 PM IST

ताज्या बातम्या