निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे

'शिवसेनेसोबत युतीसाठी अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र शिवसेना सोबत असावी अशी भाजपची इच्छा असून शिवसेनेसोबत चर्चेसाठी प्रयत्न करणार आहे. महाआघाडीचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही.'

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 04:40 PM IST

निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे

निलेश पवार, नाशिक, ता.15 सप्टेंबर : राज्यात विरोधकांच्या किती आघाड्या झाल्या तरी भाजपा एकहाती सत्ता मिळवेल. शिवसेने सोबत युतीची कुठलीही चर्चा झाली असुन लवकरच चर्चेसाठी प्रयत्न करणार असल्याची माहीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सर्वच दिग्गज नेते शिवसेनेला सोबत घेण्याची भाषा करताहेत. मात्र शिसेना आपल्या स्वबळाच्या घोषणेवर कायम आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी महाराष्ट्रातली परिस्थिती मात्र वेगळी आहे याची जाणीव भाजपला झाली असून शिवसेनला सोबत घेण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न आहे. रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आंदोलनाची आणि संघर्ष यात्रांचीही खिल्ली उडवली आहे. विरोधकांची यात्रा ज्या मार्गाने गेली तिथे भाजपाची सत्ता आल्याचे सांगत विरोधकांना जनतेने नाकारल्याचा टोमणाही त्यांनी लगावला.

काँग्रेसमुळेच इंधन दरवाढ

देशात इंधन दरवाढ होत आहे ही जरी खरं परिस्थिती असली तरी याला कॉग्रेसच जबाबदार असल्याचा जावई शोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लावला आहे. काँग्रेसने इंधनाच्या किंमती काँग्रेसने आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केल्यानेच तिथल्या भाव वाढिचा परिणाम हा देशातील इंधनाच्या दरवाढीवर होत आहे असं सांगत दानवेंनी या दरवाढीला सरकार जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास पेट्रोल डिझेलच्या किंमती आवाक्यात येतील यासाठी देशीतील सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्याशी केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री संपर्क साधत असून लवकरच यावर एकमत अशी शक्यता आहे असंही ते म्हणाले.

चार वर्षात केंद्र आणि राज्यातील एकाही भाजापाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाले नाही. भाजपाने स्वच्छ सरकार दिले. राफेल करार हा काँग्रेसच्या काळात झाल्याने यात काँग्रेसचे नेतेच गुतंलेले सापडतील असा टोलाही दानवे यांनी लगावला. भाजपचे खासदार हरिशचंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती देण्यासाठी नाशिक मध्ये आले होते.

VIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...