S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोकणात भाजप आणि राणेंचे कार्यकर्ते भिडले, गाड्यांची मोठी तोडफोड
  • VIDEO: कोकणात भाजप आणि राणेंचे कार्यकर्ते भिडले, गाड्यांची मोठी तोडफोड

    Published On: Dec 5, 2018 04:47 PM IST | Updated On: Dec 5, 2018 04:47 PM IST

    सिंधुदुर्ग, 5 डिसेंबर : कणकवलीत भाजप आणि नितेश राणेंच्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांत राडा झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. पारकर गटाच्या कार्यकर्त्याने नलावडे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची माहिती आहे. प्रतिउत्तर म्हणून नलावडे गटाने पारकर गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची मोठी तोडफोड केली आहे. यानंतर कणकवली पोलीस स्थानकात स्वाभिमानचे कार्यकर्ते तक्रार नोंदवण्यासाठी गेले. दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे तणाव निर्माण झाल्याने कणकवलीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close