पुणे भाजप शहराध्यक्षांनी रावसाहेब दानवे यांना उलटी घातली पुणेरी पगडी

पुणे भाजप शहराध्यक्षांनी रावसाहेब दानवे यांना उलटी घातली पुणेरी पगडी

भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी या वेळी रावसाहेब दानवे यांना पुणेरी पगडी परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, योगेश गोगावले यांच्याकडून अनावधानाने पगडी उलटी घालण्यात आली.

  • Share this:

अद्वैत मेहता (प्रतिनिधी),

पुणे, 6 जुलै- भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (6 जुलै) भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला देशभरात प्रारंभ झाला. पुण्यात सदस्य नोंदणी मोहिमेला केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी या वेळी रावसाहेब दानवे यांना पुणेरी पगडी परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, योगेश गोगावले यांच्याकडून अनावधानाने पगडी उलटी घालण्यात आली. काही वेळातच ही चूक लक्षात आल्यानंतर पगडी सरळ करण्यात आली.

रावसाहेव दानवेंनी केला हा गौप्यस्फोट

रावसाहेव दानवेंनी या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत भेट झाली आहे. जिल्ह्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेमके कोण भाजपच्या संपर्कात आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षात कुणालाही घ्या, येण्यास बंदी नाही. काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसले की त्याला वाटते कधी आपल्या भाजपमध्ये घेतोय सध्या कुणीही भाजपमध्ये यायला तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षाशी बोलतो आणि पक्षात घेतो, असे दानवे यांनी यावेळी सांगितले.

दानवेंची फटकेबाजी

या निवडणुकीत मतदारसंघात गेलो नाही. बूथ वर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. पण मी त्यातही गेलो नाही. कारण आजारी होतो. तरीही साडे तीन लाखांनी निवडून आलो. निवडणूक काळात फिरकले नाही तरी काही फरक पडत नाही. कारण काम केलेले असते,' असे म्हणत दानवे यांनी आपल्या निवडणूक विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

काँग्रेसवर निशाणा

'काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसची स्थिती सध्या वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आले आहेत. मोदींची लोकप्रियता, अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झाले. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले. चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस असताना कुणी पण अध्यक्ष करायला तयार होतात, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी गांधी परिवारावर टीका केली आहे.

पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या