S M L

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचा कार्यक्रमांचा धडाका

दीनदयाळ उपाध्याय स्मृती दिनानिमित्त 'समर्पण दिवस' च्या माध्यमातून झाली भाजपच्या प्रचार मोहिमेची सुरुवात.

Updated On: Feb 11, 2019 03:58 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचा कार्यक्रमांचा धडाका

विवेक कुलकर्णी, मुंबई 11 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसलीय. प्रियांका आण राहुल गांधी यांच्या रोडशोने काँग्रेसने प्रचाराची सुरुवात केलीय तर भाजपनेही सोमवारपासून प्रचाराचा धडाका सुरू केलाय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाजप प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करणार आहे.


अशी असेल भाजपची प्रचार मोहिम!


11 फेब्रुवारी - 'समर्पण दिवस' :

Loading...

नमो ॲपच्या माध्यमातून भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी ते बूथ लेव्हल कार्यकर्त्यांपर्यंत पक्षासाठी किमान 50 रुपये आर्थिक योगदान करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः समर्पण करून या मोहिमेचा शुभारंभ करतील. आर्थिक समर्पण करून सर्वांनी याचं ट्विट करायचं आहे.


12 फेब्रुवारी ते 2 मार्च - 'मेरा परिवार, भाजप परिवार' :

भाजपच्या प्रत्येक सदस्याने घरावर भाजपचा झेंडा आणि स्टिकर लावायचा आहे. हॅशटॅग #MeraParivarBhajapaParivar या नावाने फेसबुक लाईव्ह आणि ट्विट करायचं आहे. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री भाजप कार्यालयावर आणि प्रदेशाध्यक्ष औरंगाबाद येथे झेंडा फडकावून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार .


26 फेब्रुवारी - 'कमल ज्योती संपर्क' :

भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आणि सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरासमोर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत दीपप्रज्वलन करायचे आहे.


28 फेब्रुवारी - 'संघटन संवाद' :

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून थेट संवाद साधणार.


3 मार्च - 'बाईक रॅली' : #BJPVijaySankalpRally या नावाने मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन. एकाच वेळी प्रत्येक बूथ मधून किमान 5 बाईक घेऊन निघणार. भाजपचे झेंडे आणि मोदींचा मास्क घालून शहरात 30 ते 60 किमी तर ग्रामीण भागात 150 किमी रॅली काढली जाईल.


पुढील महिनाभर शासकीय जिल्हास्थानी बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करणार. जिल्ह्याच्या केंद्र स्थानी प्रमुख वक्त्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजातील विविध घटकांशी संवाद साधतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 03:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close