S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं!

माढाची जागा शिवसेनेला देण्यात आली होती. पण ही 23 वी जागा शिवसेनेकडूनही नाकारण्यात आली आहे.

Updated On: Mar 14, 2019 07:20 PM IST

पवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं!

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणूकीसाठी भाजप देऊ करत असलेली माढाची २३वी जागा शिवसेनेने नाकारली आहे. माढा मतदार संघासाठी भाजपकडे उमेदवार नसल्यामुळे ती जागा शिवसेनेला देण्यात आली होती. पण ही 23 वी जागा शिवसेनेकडूनही नाकारण्यात आली आहे.

शरद पवार माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील म्हणून शिवसेनेनं जागा नाकरली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची २३ वी जागा कोणती याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. तर माढातून भाजप किंवा शिवसेनेकडून कोणी उभं राहणार की नाही अशाही चर्चा सध्या सुरू आहे.


रणजितसिंह मोहिते पाटील वेटिंगवर

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने वेटिंगवर ठेवल्याचं चित्र होतं. रणजित सिंह हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात त्यांनी गिरीश महाजन यांची भेटही घेतली होती. पण मी वैयक्तिक कामासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली, असा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला होता.

रणजितसिंह भाजपच्या गोटात दाखल झाले तर हा राष्ट्रवादीसाठा मोठा धक्का बसेल. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तरीही त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असेल, तर राष्ट्रवादीची मोठी गोची होऊ शकते.

यातच आता भाजपकडून माढ्यात संजय शिंदे यांच्या नावाचाही विचार असल्याची चर्चा होती. संजय शिंदे यांनी मंगवारी रात्री महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संजय शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली.


हेही वाचा : Lok Sabha Election 2019: 'या' तारखेला जाहीर होणार भाजप उमेदवारांची पहिली यादी

शरद पवार माढातून उभे राहणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. पण या निर्णयाबाबत पवारांनी स्पष्टिकरण दिलं. त्या आधी त्यांनी बारामती हॉस्टेलला माढातल्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी आपण उभे राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

माढ्यात हायप्रोफाईल ड्रामा, या मतदारसंघाला इतकं महत्त्व का?

लोकसभा 2019 च्या आखाड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातल्या 'चाणक्य नीती'साठी ओळखले जाणारे शरद पवार उतरले होते. माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणाऱ्या पवारांनी आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळणार, हे जवळपास निश्चित झालं होतं. दुसरीकडे रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी माढ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं आता भाजपनं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.


SPECIAL REPORT : पवार Vs विखे वादाचा कुणाला झाला फायदा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close