News18 Lokmat

शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपचं 'पालकमंत्री पॉलिटिक्स'; या 2 तगड्या नेत्यांची नावं चर्चेत

पुण्याच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी याकडे कधी नव्हे ते राज्याचं लक्ष आहे. भाजपने थेट शरद पवारांना शह देण्यासाठी यासंदर्भात रणनीती आखल्याचं समजतं. दोन मोठ्या नेत्यांची नावं आतापर्यंत पुढे आली आहेत. दोन पाटलांपैकी पुण्याचं पालकत्व कुणाकडे येणार याची उत्सुकता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 03:16 PM IST

शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपचं 'पालकमंत्री पॉलिटिक्स'; या 2 तगड्या नेत्यांची नावं चर्चेत

पुणे, 4 जून : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर आता पुण्याचं पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे. यासाठी दोन नावं पुढे येत आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर भाजपला पुणे जिल्ह्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढावं लागेल. थेट शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपने पालकमंत्री म्हणून तगडं नाव पुढे केलं आहे. भाजपच्या विधानसभा रणनीतीचा हा भाग असल्याचं बोललं जात आहे. पालकमंत्री जरी सत्ताधारी भाजप ठरवणार असला, तरी शरद पवार यांना टक्कर देऊ शकेल तेच नाव अंतिम होणार असल्याची चर्चा आहे.

आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांच नाव घोषित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव पुढे केलं असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होम टाऊनमध्ये शह देण्यासाठी आता भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी निवड होणार असं बोललं जात आहे, तर पुण्याच्या भाजप वर्तुळात मात्र वेगळ्याच नावाची चर्चा असल्याचं समजतं.


VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर

VIDEO: काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

Loading...

आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी सांगितलं की,  भाजपच्या वाटेवर असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप काटशह देण्यासाठी वापर करू शकतो. पालकमंत्रिपदी विखे पाटलांचं नाव पुढे करण्याच्या हालचाली सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामुळे आता पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय, त्यांनी आघाडीच्या प्रचाराला जाणं देखील टाळलं. तर, त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे – पाटील यांनी कमळाला हात देत भाजपच्या तिकीटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे – पाटील यांनी विजय देखील मिळवला. हा विजय आपण आजोबांना अर्पण करत असल्याचं म्हणत त्यांन शरद पवारांना टोला हाणला. त्यानंतर भाजप आणखी एक धक्का शरद पवार यांना देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.


VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...