S M L

संजय काकडेंच्या पत्नीला भाजपकडून आॅफर, थेट बारामतीतून उमेदवारी!

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपमध्ये हालचाल सुरू आहे. संजय काकडे यांच्या पत्नी उषा यांना भाजपने उमेदवारीची आॅफर दिली आहे.

Updated On: Mar 16, 2019 06:15 PM IST

संजय काकडेंच्या पत्नीला भाजपकडून आॅफर, थेट बारामतीतून उमेदवारी!

अद्वैत मेहता,प्रतिनिधी

 पुणे, 16 मार्च : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपमध्ये हालचाल सुरू आहे. संजय काकडे यांच्या पत्नी उषा यांना भाजपने उमेदवारीची आॅफर दिली आहे. बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उषा यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळत नसल्यामुळे संजय काकडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु, तरीही भाजपकडून काकडे यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.


बारामती जिंकण्याची घोषणा करून भाजपला उमेदवारच मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपने आता थेट संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.  राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात उषा काकडेंना उमेदवारीची ऑफरही देण्यात आली आहे.

परंतु, आधीच काँग्रेसच्या वाटेवर असलेले संजय काकडे पुण्यातील उमेदवारीवर ठाम आहे. उषा काकडे यांच्या उमेदवारीबाबत काकडे यांच्याकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उषा काकडे यांना उमेदवारीची ऑफर दिल्यामुळे पुण्यातला संजय काकडेंचा उमेदवारीचा प्रश्न निकाली निघण्याची भाजपला अपेक्षा आहे.

Loading...

दरम्यान, 11 मार्च रोजी न्यूज18 लोकमतशी बोलताना संजय काकडे यांनी 'भाजपमधील कामकाजावर आपण नाराज आहोत. याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे'  असं जाहीर केलं होतं. तसंच 'भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप सोडतोय असं काहीही नाही. 2020 पर्यंत मी राज्यसभेवर आहे. मी फक्त स्थानिक कामकाजावर नाराज आहे, प्रदेशाध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहे म्हणून हा निर्णय घेतला' असंही काकडेंनी स्पष्ट केलं होतं.


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close