News18 Lokmat

भाजप खासदार संजय काकडेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

काही दिवसांआधीच संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 04:15 PM IST

भाजप खासदार संजय काकडेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

पुणे, 14 जानेवारी : पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अशोक चव्हाण आणि संजय काकडे यांची ही भेट काही दिवसांआधी झाली होती. या भेटीचे फोटो पुण्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. काकडे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक आग्रही आहेत, पण भाजपने तिकीट दिले नाही तर त्यांच्याकडून चाचपणी सुरू असल्याचं कळतं आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काकडे यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यातच चव्हाण आणि काकडे यांची एका विवाह सोहळ्यानिमित्त भेट चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थितीत होते.

दरम्यान, काही दिवसांआधीच संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. नुसती भेटच घेतली नाहीतर, त्यांच्या गाडीतून ते घरीही गेले होते.

तर दुसरीकडे, काही दिवसांआधी वाडेश्वर कड्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेत काकडे यांनी भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा केला होता.

Loading...

=============================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...