भाजप आमदाराचा पक्षातीलच खासदारावर हल्लाबोल, विधानसभेआधी मतभेद चव्हाट्यावर

भाजप आमदार विलासराव जगताप यांनी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 12:08 PM IST

भाजप आमदाराचा पक्षातीलच खासदारावर हल्लाबोल, विधानसभेआधी मतभेद चव्हाट्यावर

सांगली, 22 जून : विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण जत विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार विलासराव जगताप यांनी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे.

'भगवी वस्त्र घालणाऱ्या स्वामींनी त्यांचं काम करावं. अशा व्यक्तींचं राजकीय क्षेत्रात काय काम?' असा सवाल करत आमदार विलासराव जगताप यांनी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

आमदार जगताप यांनी जाहीर कार्यक्रमात स्वपक्षातील खासदारावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधार भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वैयक्तिक वादातून हॉटेल संचालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJPMLA
First Published: Jun 22, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...