'भाजपचे ओळखपत्र दाखवा आणि टोल भरू नका', आमदाराच्या दाव्याने खळबळ

'भाजपचे ओळखपत्र दाखवा आणि टोल भरू नका', आमदाराच्या दाव्याने खळबळ

आमदार हाळवणकर यांच्या दाव्यामुळे सरकारकडून टोल जमा करताना पक्षपातीपणा करण्यात येतो का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Share this:

मिरज, 15 जुलै : 'भाजपचे ओळखपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. कारण आयकार्डवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे,' असा दावा भाजपचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. हाळवणकर यांच्या दाव्यामुळे सरकारकडून टोल जमा करताना पक्षपातीपणा करण्यात येतो का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगलीतील मिरज इथं केला. ते भाजप बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

पक्षाच्या आमदारानेच हा धक्कादायक दावा केल्याने भाजपवर टीका होत आहे. कारण त्यांनी थेट बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करत हा दावा केला आहे. टोल वसूल करताना एका ठराविक पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून सवलत मिळत असेल तर हा पक्षपातीपणा नाही का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आमदार हाळवणकर यांच्या दाव्यानुसार जर खरंच भाजपचे ओळखपत्र दाखवून टोलपासून मुक्तता मिळत असेल तर हा प्रकार कधी थांबणार, याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावं, अशी नवी मागणी आता समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आगामी काळात सरकार आणि प्रशासन नक्की काय पाऊल उचलणार, हे पाहावं लागेल.

SPECIAL REPORT : NCPचा 6 जागांवर दावा, पुण्यात जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 09:32 AM IST

ताज्या बातम्या