लाच मागितल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्याने भाजप आमदार अडचणीत

लाच मागितल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्याने भाजप आमदार अडचणीत

आमदार तोडसाम यांनी मोबाईल वर कॉल करून अधिकारी लोकांनी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितले नाही का असं म्हणून ठेकेदाराला अप्रत्यक्षरित्या पैसे मागितले. या कॉलची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • Share this:

यवतमाळ, 08 सप्टेंबर: यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी- केळापुर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजू तोडसाम सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत आले आहेत. या क्लिपमधील  ठेकेदार आणि आमदार  यांच्यातील संवादामुळे  तोडसाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

यवतमाळ येथील शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी तोडसाम यांच्या आर्णी केळापुर मतदारसंघात रस्ता डांबरीकरणाचं काम केलं होतं. साधारण 35 लाख रूपयाचं हे काम असून पांढरकवडा तालुक्याच्या पांगरी , दडपापुर ,उमरी या गावातील रस्त्याचं काम केलं होतं. ऑनलाईन ई टेंडर पद्धतीने हे काम कंत्राटदाराला मिळालं होतं. त्याची पहिल्या रक्कमेची उचलसुद्धा त्यांनी घेतली होती. उरलेलं देयक मिळणं बाकी होतं.

पण काल दुपारी ठेकेदार शिवदत्त शर्मा यांना आमदार तोडसाम यांनी मोबाईल वर कॉल करून अधिकारी लोकांनी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितले नाही का असं म्हणून  ठेकेदाराला अप्रत्यक्षरित्या पैसे मागितले. या कॉलची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात पालकमंत्री मदन येरावार यांच्या नावाची धमकी देता का म्हणून ठेकेदार शिवदत्त शर्माला दमदाटी करण्यात आली असून पालकमंत्रीच नाही तर मुख्यमंत्रींकडे तक्रार करा अशी धमकी आमदार महोदयांनी कंत्राटदाराला दिली आहे.

या प्रकरणी कंत्राटदार पोलिसात तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 10:59 AM IST

ताज्या बातम्या