भाजपचे आमदार आशिष देशमुख बंडाच्या पवित्र्यात, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

भाजपचे आमदार आशिष देशमुख बंडाच्या पवित्र्यात, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत.

  • Share this:

09 डिसेंबर : खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकलाय. त्यांच्यापाठोपाठ  भाजप आमदार आशिष देशमुख यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून पक्षाला घरचा अहेर देत बंडाचा झेंडा फडकावलाय.

नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी सहा डिसेंबरला हे पत्र लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 11:13 PM IST

ताज्या बातम्या