S M L

'जुनी नको, नवी करन्सी आण',अनिल गोटेंची आॅडिओ क्लिप व्हाॅयरल

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2017 12:11 AM IST

'जुनी नको, नवी करन्सी आण',अनिल गोटेंची आॅडिओ क्लिप व्हाॅयरल

11 आॅगस्ट : भाजपचे आमदार अनिल गोटे वादात अडकले आहे.  विधिमंडळातल्या लक्षवेधीसाठी पैशांची मागणी करणारी आॅडिओ क्लिप व्हाॅयरल झाली आहे. अनिल गोटेंच्या आवाजातली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केली.

आमदार गोटे हे  भिसे नावाच्या व्यक्तीशी संवाद साधताय. या संवादात मोपलवार, केळकर आणि मांगलेंचाही उल्लेख केलाय. ऑडिओ क्लिपच्या शेवटी अनिल गोटे हे भिसे यांना येताना नवीन करन्सी आण, जुनी आणू नकोस असा आदेश दिलाय. अनिल गोटे हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्याचं सांगून उद्योजक,व्यापाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पैसे मागतात असा आरोप  मनोज मोरे यांनी केलाय.

अनिल गोटे आणि भिसे यांचा संवाद जशाचा तसा...भिसे - मी भिसे बोलतोय

अनिल गोटे - मुंबई क्राईम ब्रँचला तपास गेलाय...मुंबई क्राईम ब्रँचला तपास गेला...

भिसे - कुठला आपला का?

Loading...
Loading...

अनिल गोटे - हो

भिसे - साहेब कुठला?...मला कळलं नाही नेमकं?

अनिल गोटे - मुख्यमंत्र्यांनी क्राईम ब्रँचच्या तपासाचे आदेश दिलेत...

भिसे - मुंबई क्राईम ब्रँचला तपास दिला म्हणजे मांगलेच्या किडनॅपिंगचा का ?

अनिल गोटे - हं...

भिसे - त्यासाठी तुम्ही अर्ज केला होता तेच का ?

अनिल गोटे - हो मीच त्यासाठी अर्ज केला होता.

अनिल गोटे - सांगितलं ना तुला...तो मोपलवार सारखे फोन करतो

भिसे - साहेब, तुम्हीच कॉल घ्या ना...मी काय करू ते?

अनिल गोटे - मी एखादी गोष्ट कबूल केली की ती करतोच

भिसे - साहेब, घेणं आहे म्हणूनच तुम्ही करता ना? तुम्ही वडीलधारे आहात आमच्यासाठी...

अनिल गोटे - स्वत:च्या जीवापेक्षा तुम्हाला पैसे महत्त्वाचे आहेत का?

भिसे - नाही साहेब करत होतो, पण अरेंजमेंटला उशीर लागत होता...दुसरं काही नाही...तो बाहेर असल्यामुळे जरा अडचण झाली होती...तेव्हा अवेलेबल होतं त्यामुळे घेऊन आला होता तो

भिसे - बरं साहेब येतो मी उद्या तिकडे...सकाळचं फ्लाईट बघतो आणि येतो तिकडे

अनिल गोटे - हे बघ येताना नवीन करन्सी आण, जुनी आणू नकोस. इथे कोणी बाप घेत नाही इथे...कोणी हात लावत नाही त्याला, कळलं का? लागलं सगळं मार्गी आता

अनिल गोटे - घेऊन ये आणि घेऊन जा तो आदेश..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2017 12:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close