अनिल गोटे १९ तारखेला देणार आमदारकीचा राजीनामा

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदरकीचा राजीनामा दिला होता. आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 06:22 PM IST

अनिल गोटे १९ तारखेला देणार आमदारकीचा राजीनामा

धुळे, 12 नोव्हेंबर : भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल गोटे १९ तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार आहे. अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा केला आहे.दोन दिवसांपूर्वी धुळे महापालिकेच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार अनिल गोटे यांना या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते, यावेळी आमदार गोटे हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भाषणासाठी उभे राहिल्यावर सभेच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले. महाजन यांचे भाषण संपल्यावर आयोजकांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सभा संबोधित करण्यासाठी बोलावले, यावेळी आमदार गोटे मध्येच उभे राहून आधी बोलण्याचा प्रत्यन करू लागले असताना दानवे यांनी त्यांना सभेत बोलण्यापासून रोखले. यावेळी अनिल गोटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला. अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली,  हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक सुरु झाली. अखेर आमदार गोटे याना पोलिसांनी सुरक्षाकड्यात व्यासपीठावरुन सभेबाहेर नेले. या वादानंतर आमदार गोटे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.


Loading...

त्यानंतर अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला. अखेर आज त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. १९ तारखेला अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. भाजप त्यांचा राजीनामा स्विकारतो हे पाहण्याचं ठरणार आहे.


विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यात नागपूरचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदरकीचा राजीनामा दिला होता. आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 30 दिवसांमध्येच भाजपला हा दुसरा धक्का बसला आहे.===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...