भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला; भाजपची सहावी यादी जाहीर, हे आहेत उमेदवार

भाजपकडून भंडारा-गोंदियामध्ये नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 06:25 PM IST

भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला; भाजपची सहावी यादी जाहीर, हे आहेत उमेदवार

नवी दिल्ली, 24 मार्च : भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्याता आली आहे. भाजपकडून भंडारा-गोंदियामध्ये नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.Loading...

निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना भंडारा - गोंदीया, माढा आणि ईशान्य मुंबई या जागांवर उमेदवारी घोषणा करण्यात आलेली नव्हती. पण आताच्या या सहाव्या यादीमध्ये भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला असं म्हणायला हरकत नाही. तर माढा आणि ईशान्य मुंबई या जागांवर अद्याप तिढा कायम आहे.

लोकसभा 2019: भाजपची पाचवी यादी

लोकसभा निवडणुकीसाठीची राज्यातील भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत भाजपने एकूण 238 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. शनिवारी भाजपने 48 जागा जाहीर केल्या. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 46 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली होती. तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती.

बारामतीतून सुप्रिया सुळेंना कुल यांचे आव्हान

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे.

पुण्यातून शिरोळेंचा पत्ता कट

पुण्यातून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत विद्यमान खासदार अनिल शिरोळे तिकीट नाकारले आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.


VIDEO: 'राहुल शेवाळेंना आर्शिवाद आहेच पण उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद मला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...