News18 Lokmat

'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या', भाजपचे कार्यकर्ते आक्रमक

एकीकडे शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती समोर आली असतानाच आता स्थानिक नेते मात्र युती नको, अशी मागणी करताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 01:53 PM IST

'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या', भाजपचे कार्यकर्ते आक्रमक

सिंधुदुर्ग, 12 फेब्रुवारी : 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात युती नको, भाजपकडून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी,' अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केली आहे. भाजपा कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करणार नाहीत, अशी भूमिकाही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

एकीकडे शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती समोर आली असतानाच आता स्थानिक नेते मात्र युती नको, अशी मागणी करताना दिसत आहेत. 'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या. खासदार नारायण राणे यांना भेटून सुरेश प्रभूंना पाठिंबा देण्यासाठी मागणी करणार आहे', असं भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी म्हटलं आहे.

भाजप जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते मात्र एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

भाजप-शिवसेनेत कुठे-कुठे आहे संघर्ष?

मावळमध्ये भाजपचा बारणेंना विरोध

Loading...

मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. याबाबत नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना लेखी निवेदनही दिले आहे.

'श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची जबाबदारी आमची नाही', असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी बारणेंना विरोध करणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवलं आहे.

किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोध

'मातोश्री'वर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती झाल्यास भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला जोरदार विरोध केला आहे. 'किरीट सोमय्यांना युती झाली तरी शिवसैनिक मतदान करणार नाही' अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसा अहवाल विभागप्रमुखांनी 'मातोश्री'वरील बैठकीमध्ये दिला. यामध्ये पक्ष कारवाईला देखील सामोरं जाण्याची तयारी शिवसैनिकांनी दर्शवली आहे.

पूनम महाजनांना शिवसेना धक्का देण्याच्या तयारीत

भाजप खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात युवासेनेनं निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. भाजप खासदार पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. युतीत बेकी कायम असल्याचं चित्र आहे. अशातच आता शिवसेना भाजपच्या मतदारसंघात मेळावे आयोजित करून भाजपला शह देण्याची रणनीती आजमावून पाहतेय की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.


राफेल : राहुल गांधीचा मोदींवर सर्वात मोठा आरोप; UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...