युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कुणाचा? भाजपच्या बैठकीनंतर महाजनांनी दिलं उत्तर

बैठकीनंतर भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 03:02 PM IST

युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कुणाचा? भाजपच्या बैठकीनंतर महाजनांनी दिलं उत्तर

मुंबई, 22 जून : महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला, असा दावा महाजन यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबतही भाष्य केलं आहे.

'लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली,' असा गिरीश महाजन यांनी केला आहे. तसंच महाजन यांनी केला.

'सर्वांची भावना आहे की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा,' असं म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे युतीत संघर्षाची ठिणगी पडू शकते.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. 'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली.

दरम्यान, शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात काल (शुक्रवारी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading...

VIDEO : शेतकऱ्यांना दिलासा, बीडमध्ये कर्परा नदीला पूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...