मुख्यमंत्रिपदाच्या संघर्षाबद्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्रिपदाच्या संघर्षाबद्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जून : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरीही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेनं जोर पकडला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

"मुख्यमंत्रिपदाबद्दल 'आमचं ठरलंय' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. पण नेमकं काय ठरलंय हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवं. याबाबत स्पष्टता आल्यास कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील," असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्रिपदावरून युतीत ठिणगी

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. 'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली. पण भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला धक्का बसला.

'लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली,' असा दावा काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी केला.

Loading...

'सर्वांची भावना आहे की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा,' असं म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे युतीत संघर्षाची ठिणगी पडली.

VIDEO: 'मुख्यमंत्री हा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...