S M L

भाजप नेत्याकडूनही पेट्रोल पंपावर मापात पाप

रबज्योत ऑटोमोबईलवर धाड टाकून चीप लावून ग्राहकांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आणलाय. भाजपचे नागपूरचे नेते नवनित सिंग तुली यांचा हा पंप आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:02 PM IST

भाजप नेत्याकडूनही पेट्रोल पंपावर मापात पाप

26 जून : पेट्रोल पंपावर चीपच्या साहाय्याने मापात पाप करताना आता भाजपच्या नेत्याचा पदार्फाश झालाय. ठाणे शहर क्राईम ब्रांचने नागपुरच्या मानकापूर इथल्या रबज्योत ऑटोमोबईलवर धाड टाकून चीप लावून ग्राहकांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आणलाय. भाजपचे नागपूरचे नेते नवनित सिंग तुली यांचा हा पंप आहे.

पेट्रोल पंपावर इलेक्ट्राँनिक चीप लावून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या मानकापुरातील रबज्योत आटोमोबाईल्सवर ठाणे पोलीस दलाच्या क्राईम ब्रांचनं कारवाई केली आहे. हा पेट्रोल पंप भाजपचे नेते नवनीत सिंग तुली यांचा आहे.

तुली यांनी भाजपच्या तिकीटावर महापालिका निवडणूकही लढवली होती. ठाणे क्राइम ब्रांचने  विवेक शेट्टी नावाच्या आरोपीला अटक केली होती. हा आरोपी पल्सर नावाची चीप पेट्रोल पंपात लावून देत होता. देशभरात या चीप आरोपीने अनेक पेट्रोल पंपावर लावल्या आहेत.विवेक शेट्टीच्य़ा माहितीवरूनच राज्यभर ठाणे क्राईम ब्रांच ही कारवाई केली.  पोलीस महासंचालकाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या चीपचा फायदा थेट पेट्रोल पंप मालकाला होत असल्यामुळे नवनीत सिंग तुली यांचीही चौकशी होणार आहे. आणि गरज पडली तर त्यांना ताब्यातही घेतल जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 08:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close