अश्लील मेसेज पाठवून केली शरीरसुखाची मागणी, BJPच्या माजी स्वीकृत नगरसेवकावर गुन्हा

अश्लील मेसेज पाठवून केली शरीरसुखाची मागणी, BJPच्या माजी स्वीकृत नगरसेवकावर गुन्हा

महिलेला हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणे. तसेच पीडितेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 25 मे- ओळखीतील एका महिलेला हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणे. तसेच पीडितेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले, याविषयी कोणाला माहिती दिली तर कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चांदवडकर यांना कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, विक्रांत चांदवडकर (रा. तेलीवाडा, अशोकस्तंभ) यांनी महिलेस व्हॉट्सअप व फेसबुकद्वारे अश्लिल मेसेज पाठवत तिचा छळ केला. तिला शरीरसुखाची मागणी केली. 24 एप्रिल 2016 रोजी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, 17 मे 2019 रोजी फोन करुन शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी पीडित महिलेनी मंगळवारी (ता. 21) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली. तसेच या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली. सायबर क्राइम अ‍ॅक्टअंतर्गत पोलिसांनी चांदवडकर यांच्याविरोधात 66 (इ) व 67 असा गुन्हा नोंदवला आहे. चांदवडकर याला जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. सी. सांगळे करत आहेत.


विक्रांत चांदवडकर हे भाजपचे पदाधिकारी आणि हवाई वाहतूकतज्ज्ञ आहेत.


पोलिसांची फिल्मी स्टाईल दादागिरी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या