आधी पार्थ पवारांची एंट्री, आता भाजप नगरसेवकांचा विरोध; श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढल्या

भाजप नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 08:06 PM IST

आधी पार्थ पवारांची एंट्री, आता भाजप नगरसेवकांचा विरोध; श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढल्या

पिंपरी चिंचवड, 10 फेब्रुवारी : मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. याबाबत नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना लेखी निवेदनही दिले आहे.

'श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची जबाबदारी आमची नाही', असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी बारणेंना विरोध करणारे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवलं आहे.

'तिकीट दिल्यास बारणेंच्या पराभवची जबाबदारी आम्ही घेणार नाही,' असं महानगरपालिकेतील भाजपचे पक्षनेता एकनाथ पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

पार्थ पवार यांचे आव्हान

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीला अनुकूल भूमिका राष्ट्रवादीचे हायकमांड घेणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदसंघातून पार्थ यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Loading...

मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे जूने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील तीन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला साथ देईल का याकडे लक्ष राहील.

पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.


VIDEO: अमोल पालेकर प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केली टीका; पाहा काय म्हणाले..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...