भाजप नगरसेवकाचा राडा, पालिकेच्या सर्वसाधरण सभेत आणलं डुक्कराचं पिल्लू

भाजप नगरसेवकाचा राडा, पालिकेच्या सर्वसाधरण सभेत आणलं डुक्कराचं पिल्लू

अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक अजय शर्मा यांनी डुक्कराचे पिल्लू आणून सोडल्याची घटना घडलीये.

  • Share this:

28 जून : आपले लोकप्रतिनिधी कधी कोणत्या आचरट गोष्टी करतील याचा नेम नाही. अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक अजय शर्मा यांनी डुक्कराचे पिल्लू आणून सोडल्याची घटना घडलीये.

शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावर भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी सर्वसाधारण सभेत चक्क डुकराचं पिल्लू आणून सोडलं. यावरून नगरसेवक आणि आयुक्त अजय लहानेंमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

तर दुसरीकडे काल बीडमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. बीडच्या नगराध्यक्षांच्या दालनात नगरसेवकांनी कचरा आणि गटारातलं पाणी टाकलं. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर जाणीवपूर्वक स्वच्छतेच्या कामांमध्ये अडथळा आणतात, असा या नगरसेवकांचा आरोप आहे. यामध्ये काकू-नाना विकास आघाडीचे आणि एमआयएमचे नगरसेवक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 07:11 PM IST

ताज्या बातम्या