बुलढाणा,18 ऑक्टोबर: अवैध सावकारीप्रकरणी बुलढाण्यातील भाजप नगरसेवक आणि शिवसेनेच्या युवा अध्यक्ष यांना अटक करण्यात आली आहे.पैसे परत केले नाही म्हणून यांनी एका इसमाला मारहाण केल्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांनी खामगावच्या अकबर खान याला व्याजानं पैसे दिले होते. ते अकबर खान वेळेत परत देऊ शकला नाही.त्यामुळे संतापलेल्या राकेश राणा आणि राहुल कळमकरसह चौघांनी खान यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत खान यांचे ३ दात तुटले. त्यांना उपचारासाठी अकोला इथॆ हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन भाजप नगरसेवक राकेश राणा आणि शिवसेना युवा शाखेचे शहर प्रमुख राहुल कळमकर अटक केलीय. त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.तर आणखी दोन आरोपी गौरव राणा आणि आनंद सेवक हे सध्या फरार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा