Elec-widget

भाजपचा नराधम नगरसेवक,लग्नासाठी तरुणीवर 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार!

भाजपचा नराधम नगरसेवक,लग्नासाठी तरुणीवर 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार!

धिरज तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तसंच, तिची कागदपत्रं मिळवून त्या आधारे तिचं मतदान ओळखपत्र तयार केलं. तसंच तिचं फेक फेसबुक अकाउंटही उघडलं.

  • Share this:

यवतमाळ,21 जुलै : तरुणीसोबत मैत्री करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत सतत पाच वर्ष लैंगिक अत्याचार करणाऱ्या वणीच्या भाजप नगरसेवक धीरज पाते याला अटक करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींवर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडालीय.

नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

वणी शहरातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनी सोबत भाजप नगरसेवक धीरज दिगंबर पाते (वय २९) याने मैत्री करून तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. आरोपी धीरज याचा खोटेपणा जेव्हा मुलीच्या लक्षात आला तेव्हा पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आरोपी पीडितेवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तर तरुणीचे सर्व खोटे कागदपत्र तयार करून तिला ब्लॅकमेल केलं जात होते.

धिरज तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तसंच, तिची कागदपत्रं मिळवून त्या आधारे तिचं मतदान ओळखपत्र तयार केलं.  तसंच तिचं फेक फेसबुक अकाउंटही उघडलं. यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना या प्रकरणाची कल्पना दिली. कुटुंबीयांनी धीरजशी संपर्क करून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे देण्याच्या बदल्यात धीरजने पाच लाख रुपयांची मागणी केली आणि मागणी मान्य न केल्यास बदनामी करण्याची धमकीही दिली.

Loading...

 अंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

पीडित तरुणीने शनिवारी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून वणी पोलिसांनी नगरसेवक धीरज पाते विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर आरोपी धिरजला बेड्या ठोकण्यात आल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...