News18 Lokmat

जळगाव: स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपने अचानक बदलला उमेदवार

स्मिता वाघ यांचा यांचा पत्ता कट करत भाजपनं ऐनवेळी उमेदवार बदलला आहे. चाळीसगावचे विद्यमान आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांना आता भाजपनं उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 02:32 PM IST

जळगाव: स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपने अचानक बदलला उमेदवार

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

जळगाव, 04 एप्रिल : जळगावमध्ये भाजपनं उन्मेष पाटील यांना बुधवारी रात्री बी फॉर्म दिला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा यांचा पत्ता कट करत भाजपनं ऐनवेळी उमेदवार बदलला आहे. चाळीसगावचे विद्यमान आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांना आता भाजपनं उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र स्मिता वाघ यांच्या नावाबाबत भाजपकडून पुनर्विचार केला जातोय अशा अनेक चर्चाही काही दिवसांआधी रंगल्या होत्या.

दुसरीकडे, मुंबईतही युतीमध्ये कलह सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला होता. प्रथम मातोश्रीवरून सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. या सर्व घडामोडींवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झालं होतं.


Loading...

VIDEO: भाजपनं विमान पाठवलं म्हणून मी मुंबईला गेलो - अब्दुल सत्तार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...