'नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावण्याचे आदेश दिले आहेत'

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 10:49 AM IST

'नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावण्याचे आदेश दिले आहेत'

मुंबई, 8 जुलै : आमदार नितेश राणे यांनी अभियंत्याला केलेली मारहाण आणि शिवीगाळ प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नितेश राणे यांनी ज्या अभियंत्याला मारहाण केली त्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळीचा हा व्हिडिओ आहे.

'अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केलाचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत,' असं अभियंत्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील हे सांगत असल्याचं या ध्वनीचित्रफितीमध्ये ऐकायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडिओमुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळणार असल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

चंद्रकांतदादांना भाजपकडून घरचा आहेर

Loading...

या प्रकरणात भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर मिळाला होता. कारण सिंधुदुर्ग भाजपने नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा विरोध होऊ नये म्हणून भाजप नेते आणि महसूलमंत्री अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं. पण त्यानंतर सिंधुदुर्गमधील भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना घरचा आहे देत तुम्ही आधी महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करा, अशी मागणी केली होती.

तिवरे धरणाविरोधात तक्रार दिलेल्या अजित चव्हाणांनी गमावले कुटुंबातील 5 जण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...