'आता सगळा हिशेब करणार', भाजपचं शरद पवारांना 'ओपन चॅलेंज'

राष्ट्रवादीतून नेत्यांचं होत असलेल्या आऊटगोईंगच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 02:53 PM IST

'आता सगळा हिशेब करणार', भाजपचं शरद पवारांना 'ओपन चॅलेंज'

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 28 जुलै : 'येणारे सरकार मजबूत असणार आणि आता सगळा हिशेब करणार, तुम्ही महाराष्ट्र लुटला आहे,' असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीतून नेत्यांचं होत असलेल्या आऊटगोईंगच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांना चंद्रकांत पाटलांनी आक्रमक उत्तर दिलं आहे. 'आम्ही कुणाला इनकम टॅक्स रेडची भीती दाखवली ते सांगा. तुम्हाला आपली माणसं आपल्याला जपता येत नाहीत आणि दुसऱ्याला दोष द्यायचा. भाजप कुणालाही ईडी किंवा इनकम टॅक्सची भीती दाखवत नाही,' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

'सहानुभूती निर्माण करण्यासाठी शरद पवार अशा प्रकारची विधानं करत आहेत. पण त्यांनीच गेल्या 70 वर्षात देश लुटला आहे,' असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या जहरी टीकेला आता राष्ट्रवादी कसं उत्तर देणार, हे पाहावं लागेल.

काय होता शरद पवार यांचा आरोप?

'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Loading...

भाजपविरुद्ध शरद पवार आक्रमक

- पंढरपूरच्या कल्याणराव काळे यांना दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं

- दौंडच्या राहुल कुल यांनाही याच पद्धतीने सुप्रियाविरोधात लोकसभा निवडणुकीत उभं राहण्यास भाग पाडलं

- छगन भुजबळ यांना विनाकारण तुरूगांत टाकलं

- भाजपचं सरकार विरोधकांना धमकावत आहे

- हसन मुश्रीफ यांनी पक्षांतराला नकार दिला म्हणूनच त्यांच्या घरावर छापे घातले गेले

- चित्रा वाघ मला भेटून गेल्या. माझ्या पतीच्या विरोधात केसेस आहेत. त्या सोडवण्याच्या बदल्यात मला पक्षांतर करावं लागत आहे, असं त्यांनी सांगितलं.

- फोडाफोडीसाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातच नाहीतर कर्नाटकातही तेच झालं

- कायद्याचं राज्य आहे की नाही अशी शंका वाटावी अशी परिस्थिती

VIDEO: शरद पवारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...