गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस;12 तास गाऊन वैशाली शिंदे देणार मानवंदना

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस;12 तास गाऊन वैशाली शिंदे देणार मानवंदना

गेली 75 वर्ष त्या संगीताची साधना करत आहेत. त्यांनी अनेक बहारदार गाण्यांनी लोकांचे रंजन करत आहेत.त्यांना मानवंदना देण्यासाठी कल्याणमध्ये एका विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तसंच अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

कल्याण, 28सप्टेंबर: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. गेली 75 वर्ष त्या संगीताची साधना करत आहेत. त्यांनी अनेक बहारदार गाण्यांनी लोकांचे रंजन करत आहेत.त्यांना मानवंदना देण्यासाठी कल्याणमध्ये एका विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये 12 तास 100 गाणी गाऊन त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. सुप्रसिध्द गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत कलेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खानदेश कोकिळा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली शिंदे या नवा विक्रम नोंदवणार आहेत. 12 तास गायल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली जाणार आहे.

तसंच अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांचे व्यंगचित्र काढून त्यांना राज ठाकरे यांनी मानवंदना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 08:50 AM IST

ताज्या बातम्या