धावत्या एसटी बसमध्ये बाळाला जन्म देऊन निर्दयी आई झाली पसार

धावत्या एसटी बसमध्ये बाळाला जन्म देऊन निर्दयी आई पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी पांढरकवडा- यवतमाळ एसटी बसमध्ये ही घटना घदली.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 01:58 PM IST

धावत्या एसटी बसमध्ये बाळाला जन्म देऊन निर्दयी आई झाली पसार

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 5 जून- धावत्या एसटी बसमध्ये बाळाला जन्म देऊन निर्दयी आई पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी पांढरकवडा- यवतमाळ एसटी बसमध्ये ही घटना घदली.

मिळालेली माहिती अशी की, पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नाताल्या काळीमा फासणारी घटना घडली. एका गरोदर महिला प्रवासीने एसटी बसमध्येच नवजात बाळाला जन्म दिला. नंतर ही महिला बाळाला एसटी बसमध्येच सोडून पसार झाली. पांढरकवडा आगाराची एसटी बस (MH 06 S 8824) पांढरकवड्याहून यवतमाळकडे निघाली होती. सायंकाळची वेळ असल्याने बसमधील लाईट बंद होते. या अंधारातच महिलेची प्रसूती झाली. तिने धावत्या बसमध्येच एक नवजात बाळाला जन्म दिला.

आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खात्री करुन ती महिला बाळाला बसमध्येच बेवारस सोडून एका थांब्यावर उतरून गेली. नंतर ही बस यवतमाळ बस स्थानकावर पोहोचली असता वाहक व चालक बस खाली उतरत असताना त्यांना बसमध्ये रक्त सांडलेले दिसले. चालकाने बसमधील मधोमध आसनांखाली बघितले असता त्यांना एक नवजात बाळ दिसले. हे बाळ मृत अवस्थेत होते. या बाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मृत नवजात बाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आली आहे. बाळाला जन्म देणाऱ्या निर्दयी आईचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत.

महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात गेल्या आठवड्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसूती करावी लागली. ही दुदैवी घटना आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय अर्थात नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घडली. या घडनेमुळे डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

बाळ आणि बाळंतीनला झोपवले फरशीवर..

धक्कादायक म्हणजे बाळ आणि बाळंतीनला फरशीवर झोपवण्यात आले. सुदैवाने बाळ आणि बाळंतीन सुखरूप आहे. परंतु या घटनेने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरातील आरोग्य सेवेचा ढिसाळ कारभार जगासमोर आणला आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकिय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे घडला. सुकेशनी चतारे असे पीडित महिलेचे नाव आहे. सुकेशनी हिच्या पतीने सांगितले की, सुकेशनीला रविवारी पहाटे प्रसूती वेदना व्हायला लागल्या. पण डॉक्टर झोपेत होते. तिला वेदना असाह्य झाल्याने तिला स्वता:च प्रसूती करावी लागली. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा थांबला नाही. बाळ आणि बाळंतीनला अक्षरश: फरशीवर झोपवण्यात आले.


VIDEO: पुण्यात वन विभागाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...